Top News

भव्य रक्तदान शिबीर पोलीस ठाण्यात संपन्न. #Blooddonation



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- आज दिनांक 03/09/2021 रोजी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे मा श्री अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व मा. श्री मिलिंद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी, यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येणारी शांतता कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती, सार्वजनिक गणेश मंडळ, व्यापारी असोसिएशन समिती सिंदेवाही, पत्रकार बंधु, व शहरातील युवावर्ग यांच्या सहकार्याने चंद्रपूर जिल्ह्यातील रक्त पेढीमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने गणेश उत्सव साजरा न करता सामाजिक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे रक्तदानाचा महायज्ञ शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.#Adharnewsnetwork


त्यामध्ये सिंदेवाही तालुक्यातील युवा वर्गाने उस्फूर्त प्रतिसाद देऊन एकूण 123 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.
तसेच सदर रक्तदानाचा महायज्ञ शिबिराला मा.श्री मिलिंद शिंदे उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मपुरी, मा. श्री गणेश जगदाळे तहसीलदार सिंदेवाही, श्री अरुण गौड वनपरिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही, श्री अमोल बनसुरे व शशिकांत पेंढारकर तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही तसेच लोक प्रतिनिधी श्री रमाकांत लोधे जि प सदस्य, श्री नागराज गेडाम सभापती समाज कल्याण जि प चंद्रपूर, श्री राहुल पोरेड्डीवार जि प सदस्य, तसेच सौ आशाताई गंडाटे अध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाही, श्री स्वप्निल कावळे उपाध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाही, सिंदेवाही तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बंधू व भगिनी यांनी रक्तदात्यांचा उत्साह वाढवण्याकरिता रक्तदानाच्या महायज्ञ शिबिराला भेट दिली.
तसेच सिंदेवाही स्टेशनचे ठाणेदार श्री योगेश घारे व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार रक्तपेढी चंद्रपूर व ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथील वैद्यकीय पथक यांनी रक्तदानाचा महायज्ञ शिबिर यशस्वी होण्याकरिता येतोचित्त परिश्रम घेतले.
सिंदेवाही पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व सिंदेवाहीवासियांनी कौतुक करून शुभेच्छा दिलेल्या आहेत.#Blooddonation

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने