जाहिरात... Advertisement... विज्ञापन

जिवती येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटामाटात साजरी. #Program(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- ३१ ऑगस्ट २०२१ रोजी जिवती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जनसेवा प्रतिष्ठान च्या जागेवर साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती थाटामाटात पार पडली.
सर्वात पहिल्यांदा समाजाचे जेेष्ठ नागरिक मा.भोजुकाका गायकवाड व मा.हरिभाऊ मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जिवती येथील बस स्टॉप पासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जनसेवा प्रतिष्ठान पर्यंत भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली.#Adharnewsnetwork
त्यानंतर भाषणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटक नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते मा.प्रभाकर शिंदे,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दत्ता तोगरे तर मुख्य मार्गदर्शक युवा व्याख्याते मा.सचिन मेकाले व इतर पाहुणे विचार पिठावर उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा.सचिन मेकाले यांनी जवळ पास दिड तासाच्या आपल्या व्याख्यानात बहुजन समाज,बहुजन महापुरुष, मातंग समाजाची दशा व दिशा या विषयावर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी अनिस चे राज्य समन्वयक मा.हरिभाऊ पाथोडे,मा. दहागावकर तसेच मा.प्रभाकर शिंदे सर,नागपूर,मा.डॉ.अंकुश गोतावले,दत्ता तोगरे यांची भाषणे झाली.तसेच barti चे समतादुत मा.बालाजी मोरे यांनी अंधश्रध्दा निर्मूलनावर आधारित अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून काही वैज्ञानिक प्रयोग करून दाखविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.देविदास कांबळे यांनी, प्रस्ताविक मा.भानुदास जाधव यांनी तर आभार प्रदर्शन मा.शाहीर संभाजी ढगे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा.प्रल्हाद मदने,मा.शाहीर तुकाराम जाधव,मा.डॉ.पांडुरंग भालेराव व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी जवळ पास चारशे ते पाचशे लोक उपस्थित होते.#Program

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत