(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्णा:- जामखुर्द बस स्टॅण्ड नजीक मुल- पोंभूर्णा मुख्य मार्गाच्या कडेला दि.१८ सप्टेंबरला सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्या अज्ञात इसमाची ओळख पटवण्यात पोंभूर्णा पोलिसाला यश मिळाले आहे.
मृतक प्रितम भाऊराव चांदेकर हा चंद्रपूर, बाबुपेठ, सिद्धार्थ नगर,वार्ड नंबर १७ येथील तो रहिवासी होता.
जामखुर्द हद्दीत अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह.
दि.१८ सप्टेंबर ला जामखुर्द येथील व्यायामासाठी गेलेल्या तरुणांना सदर व्यक्ती मृत अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली.त्यानुसार सदर घटनेचे मर्ग दाखल करून पोंभूर्णाचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक दादाजी ओल्लालवार, बिट जमादार सुरेश बोरकुटे, राजकुमार चौधरी यांनी गांभिर्याने तपास सुरू केला होता. ओळख पटविण्यासाठी अनेक गावे पिंजून काढले होते.
दि.१८ सप्टेंबरच्या रात्री पोंभूर्णा पोलिसांना मृतकाच्या संबंधाने नलेश्वर- चिरोली येथून सुगावा लागला. त्या माध्यमातून तपास केल्यानंतर संबंधित मृतकाची ओळख पटली.
सदर मृतकाचे आपल्या पत्नीशी पाच वर्षापुर्वी काडीमोड झाले होते. त्यामुळे पत्नी आपल्या दोन मुलींसह दुसरीकडे राहत होती व मृतक हा एकटाच वृद्ध आई वडिलाकडे राहत होता. प्रितमला दारूचे वेसन होते. शिवाय काही दिवसांपासून त्याची मानसिक स्थिती ठिक राहत नव्हती. तो घरच्यांना न सांगता कुठेही भटकंती करायचा. जिथे गेला तिथे तो मिळेल ते काम करायचा व आपली गरज भागवायचा.
मृतक प्रितम आपल्या भावाच्या सासुरवाडीला (नलेश्वर) येथे जातो म्हणून निघाला होता. मृतकाला वृध्द आई वडील, चार भाऊ, एक आंधळी बहिण आहे. पोंभूर्णा पोलिसांनी अगदी काही तासांतच मृतकाची ओळख पटवण्यात यश मिळविले आहे.