विमाशीच्या तालुका अध्यक्षपदी प्रविण निमसटकर. #Pombhurna

Bhairav Diwase

पोंभूर्णा :- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तालुका पोंभूर्णा ची तालूका कार्यकारिणी नुकतीच एका कार्यक्रमात गठीत करण्यात आली.
विमाशीचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले, जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी रोंड यांच्या उपस्थितीत गठीत करण्यात आलेल्या कार्यकारिणी तालुका अध्यक्षपदी प्रविण निमसटकर यांची तर कार्याध्यक्ष मनोज अहिरकर, कार्यवाह इंदल राठोड, उपाध्यक्षपदी अमोल माथनकर,चनकापुरे,भीवगडे, सहकार्यवाहपदी रोशन गेडाम, उंदीरवाडे, कोषाध्यक्ष देवानंद रामटेके, संघटकपदी सुरेंद्र येलीचपुरवार, मारोती चनकापूरे, सल्लागार म्हणून अमरसिंह बघेल,मुसळे तर महिला प्रतिनिधी कल्पना वाघ, मत्ते यांची नियुक्ती करण्यात आली.
सरकार्यवाह जगदिश जुनघरी, उपाध्यक्ष लक्ष्मण धोबे, उपाध्यक्ष सुनिल शेरकी, नपांडूरंग पिंपळकर, विकास येलेटिवार, भास्कर मेश्राम यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले