Top News

अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा एल्गार. #Pombhurna

आष्टा, सोनापूर गावच्या शेकडो महिला धडकल्या पोलिस ठाण्यावर.

ग्रामपंचायतीने घेतला दारूविक्रेत्या विरोधात ठराव.
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील गटग्रामपंचायत आष्टा येथे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे, तर व्यसनामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. आष्टा व सोनापूर गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी शेकडो महिलांनी पोंभूर्णा पोलिस ठाण्यात पोहोचून तक्रार देत कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
आष्टा ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत असून आष्टा व सोनापूर हे दोन गावे त्यात येतात. तालुक्यातील माॅर्डन ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या या दोन्ही गावात अवैध दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सकाळ पासून मद्यपीची लाईन दारु व्यवसायीकाच्या घरासमोर लागलेली असते. लाॅकडाऊनच्या काळापासून येथील अवैध धंद्यांना ऊत आला असून गावातील दोन इसमाकडून मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. देशी, विदेशी, मोहफुलाची दारू आणून गावात विक्री करीत आहेत. यामुळे गावातील वातावरण कलुषित होत असून महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आष्टा व सोनापूर येथील अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे. तसेच संबंधित दारु विक्रेत्यावर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतने ठराव घेतला आहे. यासंदर्भातील निवेदन पोंभूर्णा पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार निलकंठ कुकडे यांना आष्टा ग्रामपंचायतच्या सरपंचा तथा शिवसेना महिला आघाडीच्या पोंभूर्णा तालुका प्रमुख किरण डाखरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार, तालुका समन्वयक विजय वासेकर, ग्रामपंचायत सदस्य अर्चना दिवसे,लता वडस्कर,शारदा दिवसे, अर्चना पिंपळशेंडे, संगिता पिंपळशेंडे,वंदना वडस्कर,शिला पिंपळशेंडे, वैशाली दिवसे, सुलोचना दिवसे आदी महिला व गावकरी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होत्या.

अवैध दारू विक्री बंद न झाल्यास ठिय्या आंदोलन.

आष्टा व सोनापूर गावात दोन इसम मागील काही महिन्यांपासून अवैध दारू विक्री व्यवसाय करीत  असून अनेकदा त्यांना समज देऊन सुद्धा ते दारूचे व्यवसाय करीत आहेत. गावातील तरुण युवक, वयस्क व्यक्ती दारूच्या आहारी गेले आहेत. अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. दोन्ही गावातील दारू व्यवसायीकांवर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतने ठराव घेतला आहे.
या गावातील दारू विक्री बंद न झाल्यास शेकडोंच्या संख्येने महिला पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करतील.
किरण डाखरे
ग्रामपंचायत आष्टा सरपंच तथा शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने