पोंभुर्णा तालुक्यातील कोवीड-१९ लसीकरण केंद्रांची यादी पहा एका क्लिकवर. #Vaccinationcenter #pombhurnataluka #vaccination7

Bhairav Diwase


पोंभुर्णा:- प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा व नवेगाव मोरे अंतर्गत तालुका पोंभुर्णा येथे दिनांक 30/9/2021 ला कोवीशिल्ड लसिकरणाचे आयोजन करण्यात आले आहे तरी १८ वर्षाच्या वरील सर्व पहिला व दुसरा डोज तसेच गरोदर व स्तनदा मातांना डोज देण्यात येणार आहे.
    तरी गावात व्यापक प्रमाणे प्रसिध्दी, प्रचार करण्यात यावे. आरोग्य सेवक, सेविका, आशा यांनी, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांना या लसिकरणाची माहिती द्यावी व १००% लसिकरण होईल या कडे विशेष लक्ष द्यावे.
   
लसिकरण स्थळ.
१) रामपूर दीक्षित
२) आंबेधानोरा
३) खरमत
४) चेक आष्टा
5) घोसरी
6) थेरगाव
७) ठाणेवासना

या ठिकाणी लसिकरण उपलब्ध आहे. लसिकरणाला येताना आधारकार्ड, मतदान ओळखपत्र व मोबाईल नंबर सोबत आणावे. तसेच कोरोणा प्रतिबंधक नियमांचे पालन करावे.
आदेशान्वये......
मा. डॉ. संदेश मामीडवार
तालुका आरोग्य अधिकारी पोंभुर्णा.