भाजयुमो पोंभुर्णा तर्फे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या थकीत अनुदाना संदर्भात तहसीलदारांना निवेदन. #Pombhurna

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे अनुदान जुलै 2021 पासून थकीत आहे. पोंभुर्णा तालुक्यात बहुतांश लाभार्थ्यांचं जीवन व घर त्यांचा उदर निर्वाह या अनुदाना वर चालते. परंतु मागील काही महिन्यापासून या निराधाराना अनुदान शासना कडून येत नाही आहे. त्यामुळे निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी मोठ्या संकटात सापडलेला आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी च सरकार आल्यापासून हे सरकार सामान्य जनतेच्या प्रश्नाना कडे डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे. मग विध्यार्थी असो व वृद्ध सर्वांना टोपी लावण्याच काम हे सरकार करत आहे. यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चा च्या माध्यमातून ता. पोंभुर्णा तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले. त्याची दखल घेत तहसीलदाराणी तात्काळ कलेक्टर ऑफिस चंद्रपूर यांना पत्र व्यवहार केला आहे. व लवकरात लवकर या निराधार लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान त्यांच्या खात्यात मिळेल असे आश्वासन पोंभुर्णा तहसीलदार यांनी दिले.
या प्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अजय मस्के, पंचायत समिती उपसभापती सौ. ज्योती बुरांडे, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, रुषी कोटरंगे, मोहन चलाख, आदित्य तुम्मूलवार, विनोद कानमपल्लीवार, अमोल मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.