💻

💻

"अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत" अध्यक्षपदी शेखर पटले तर सचिवपदी मुकेश गेडाम यांची निवड. #Chandrapur

चंद्रपूर:- दि.26सप्टेंबर ला झाडीपट्टीतील रंगकर्मींची सभा आमगाव येथे जेष्ट कलावंत डॉ.परशुराम खुने यांच्या अध्यक्षतेखाली घेन्यात आली. या सभेत झाडीपट्टीतील शेकडो रंगकर्मी ऊपस्थीत होते. व समस्त कलावंतांच्या वतीने कलावतांच्या हीतासाठी "अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषद" ची स्थापना करन्यात आली.
यात अध्यक्ष म्हनुन शेखर पटले, तर सचीव पदासाठी मुकेश गेडाम यांची निवड करन्यात आली. तसेच कार्यकारीणी परिषदेचे उपाध्यक्ष म्हनुन कीरपाल सयाम, प्रियंका गायधने, कीशोर भाग्यवंत, देवा कावळे..सहसचीव म्हनुन ज्ञानेश्वरी कापगते, वासुकुमार मेश्राम, सुनील कुकुडकर, दुधाराम कावळे तर सदस्य म्हनुन शेरु खान, वीनोद काळे, प्रतीभा साखरे, शंभुदेव मुरकुटे, ऊत्तम ऊके, लालचंद पुंगाटे, कोषाध्यक्ष-शंतनु कुळमेथे यांची निवड करन्यात आली.
सदर परिषदेचे सल्लागार/मार्गदर्शक म्हनुन झाडीपट्टीचे जेष्ट कलावंत डॉं.परशुराम खुने, अंबादास कामडी, प्रा.डॉ.दिनकर चौधरी, डॉ.प्रवीन सहारे यांची नीवड करन्यात आली.
प्रसीद्धी प्रमुख-राहुल पेंढारकर, मंगल मशाखेत्री, होमदेव कोसमशीले हे काम सांभाळतील. सभेचे संचालन राहुल पेंढारकर, प्रास्तावीक देवा कावळे तर आभार कीरपाल सयाम यांनी मानले..नीवड प्रक्रीया प्रमुख म्हनुन प्रा.डॉ.दिनकर चौधरी, तर सहप्रमुख म्हनुन डॉ.प्रवीन सहारे यांनी ऊत्तम नीयोजन करुन अवीरोध नीवडप्रक्रीया पार पाडली.

अखिल झाडीपट्टी नाट्य परिषद ही झाडीपट्टीतील कलावंतांच्या पाठीशी ऊभी राहुन झाडीपट्टीच्या वीकासासाठी नक्कीच कटीबद्द असेल, असे परिषदेच्या वतीने ऊपस्थीत रंगकर्मींना वीश्वास देन्यात आला. निवड केलेल्या कार्यकारीनी मंडळास झाडीपट्टीतील अनेक रगकर्मींनी पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दील्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत