ई-पीक पाहणी या ॲप विषयी सूरज मडावी यांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन. #Pombhurna

Bhairav Diwase

पोंभूर्णा:- महसूल विभागाचा ई- पीक पाहणी प्रकल्प राज्यभर राबविण्यात येत आहे. पोंभूर्णा तालुक्यात ई-पिक पाहणी ॲप चे माध्यमातून स्वताच शेतकऱ्यांना पिक पेऱ्याची नोंद करायची होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी पिक पेऱ्याच्या नोंदणीचे काम सुरू केले आहे.

    पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी महाविद्यालय परभणीचे विद्यार्थी सूरज महादेव मडावी यांनी ग्रामीण भागात जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक जोड कार्यक्रम सन २०२१-२२ या अभ्यास दौऱ्यावर असताना चिंतलधाबा या गावात शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी या ॲप विषयी माहिती दिली.

     तसेच इतर कृषी संबधीत ॲप विषयी मार्गदर्शन केलं. सूरज महादेव मडावी यांनी शेतकऱ्यांना फवारणी बदल मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सचिन मडावी, गीता मडावी, रामू कन्नाके आणि मालता कन्नाके यांच्यासह अनेकाची उप‍‍स्थिती होती.