Top News

गडचांदूर येथे आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांना केले मंत्रमुग्ध. #Program



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचांदूर:- कोरपना सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी द्वारा आयोजित शेतकरी प्रबोधनमेळाव्यात महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी योजना अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले जागतिक पातळीवर निर्माण झालेली परिस्थिती अभ्यासकांनी भविष्यातील समस्या यावर चिंतन करीत असून हवामानातील बदल शेतकरी दुष्काळ अतिवृष्टी अशा संकटात निर्माण झालेली परिस्थिती हवामानाच्या बदलत्या ऋतू बरोबर शेतकऱ्यांनाही उत्पादनात घेण्याची गरज वाढली आहे.
यावेळी शेतकरी चळवळीचे नेते पाशा पटेल यांनी अभ्यासपूर्ण शेतकरी समस्यांच्या विषयावर हात घालीत पृथ्वी रक्षण व मानव विकास आवश्यक असलेल्या गरजा भरून काढणे कठीण झाल्याने जगाच्या पातळीवर चिंतन होऊ लागले आहे शेतकऱ्यांचं दारिद्र्य सुटता सुटत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना घोंगावत असलेले संकटावर मात करणे गरजेचे झाले आहे परंपरागत शेती कष्ट करूनही शेतकऱ्यांची माती होत आहे आज वाढलेले प्रदूषण हवामानात झालेला बदल थांबला नाही तर अनेक देशांना संकटाला सामोरे जावे लागणार आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी जंगलतोड थांबवून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे बदलत्या परिस्थिती बरोबर वाढत्या कार्बन आक्ससाईड ऑक्सिजनची कमतरता मानव प्राणीचे आयुष्य नऊ वर्षांनी कमी होण्याची परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीवर मात करण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन डिझेल पेट्रोल कोळसा यावर प्रतिबंध घालण्यासाठी अख्ख जग पुढे आला आहे.#Adharnewsnetwork


 शेतकऱ्यांनी शेती पिकाचे उत्पादन घेण्यासाठी विकेल ते पिकेल या सिद्धांतावर वाटचाल करण्यासाठी बांबू लागवड हा नवीन पर्याय शेतकऱ्यांना सार्थकी हितेशी ठरणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी आता पुढे यावे अनेक उदाहरण देऊन शेतकऱ्यांना मंत्रमुग्ध केले आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक संत साधुनी वुक्षा गरज आपल्या प्रबोधनातून संत महात्म्यांनी जपली मात्र वाढत्या गरजा लोकसंख्या यामुळे झालेल्या वृक्ष शोषणाचा परिणाम आज जगाच्या पाठीवर दिसून येत आहे शेतकऱ्यांचं अनेक प्रश्न कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी कधी नापिकी अशा अनंत संकटातून शेतकरी उभा राहतो कोरोना सारख्या परिस्थितीने मानव जातीला कशाची गरज आहे हे निसर्गाने व परिस्थीतुन दाखवून दिले आज आपण सावध होऊन पर्यावरणाचे रक्षण ही जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे वक्त्यानी व त्यांनी शेतकऱ्यांच्या दुखण्यावर फुंकर घालीत आपल्या प्रभावी वक्तृत्वाने उपस्थित शेतकऱ्यांची मने जिंकली बांबू रिसर्च सेंटर चे संजीव करपे यांनी बांबूपासून कसा बदल घडू शकतो याचे सादरीकरण केले इथेनाल आक्सीजन यासह वापरात व खाद्य म्हणुन बांबु पासुननिर्मित वस्तु दाखवित बांबुचे महत्व भविष्याची गरज .ओळखा असे आवाहन केले यावेळी माजी आमदार संजय धोटे आबिद अली यांनी विचार मांडून रोजगार हमी योजनेतील अटी शिथिल करून शेतकऱ्यांच्या फळबाग वुक्षलागवड बांबू लागवड या कार्यक्रमासाठी रो,ह,यो 10 हेक्‍टरपर्यंत मर्यादा करण्याची मागणी केली तसेच अटल बांबू मिशन नॅशनल बांबू अभियान याकार्यक्रमत चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यासाठी राबवण्याची मागणी केली यावेळी कृषी उपसंचालक मनोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य जिल्हा कृषी अधिक्षक भराडे तहसिलदार वाकलेकर सवंर्ग विकास अधिकारी पाचपाटील तालुका कृषी अधिकारी डमाले यांच्यासह गोंडपिपरी वणी कोरपना राजुरा जिवती येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते कार्यक्रमाचे संचालन प्रवीण काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुहेल अली यांनी मानले यावेळी शरद जोगी अजहर शेख शंकर ठावरी श्रीनिवास मुसळे इरफान शेख इमरान कुरेशी यांचेसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी च्या या शेती समृद्धी चा नवीन पर्याय कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे मत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.#Program

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने