राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसचे पेढे वाटून अनोखे आंदोलन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. महेबूब भाई शेख व चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. नितीन भटारकर यांच्या निर्देशानुसार आज दिनांक २०/१०/२१ रोजी देशातील पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात राजुरा येथे व संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले.
देशात सध्या वाढत असलेली महागाई व त्यासोबतच पेट्रोल डिझेल गॅस चे दर सुद्धा गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग व सर्वसामान्य कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोना मुळे लॉकडाऊन मध्ये संकटात सापडलेली सर्वसामान्य जनता या संकटातून बाहेर आली नाहीये. आणि त्यातच या वाढत्या महागाई मुळे आता दोन वेळच्या जेवणाची सोय सुद्धा होणे कठीण झाले आहे.
म्हणूनच आज राजुरा येथे राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष श्री. आसिफ सय्यद यांच्या नेतृत्वात राजुरा येथील पेट्रोल पंपावर पेढे वाटून पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या शुभेच्छा देत केंद्रसरकारच्या विरोधात व पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत अभिनव आंदोलन करण्यात आले.
तसेच ही दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेस पार्टी तर्फे देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी तालुका काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री. संतोष देरकर, शहर अध्यक्ष श्री. रखीब शेख, युवक शहर अध्यक्ष श्री. स्वप्नील बाजुजवार, शहर उपाध्यक्ष श्री. सुजित कावळे, युवक कोषाध्यक्ष श्री. किशोर रासेकर, तालुका महासचिव सलमान शेख, तालुका महासचिव अजय ढूमने, तालुका सचिव साहिल शेख, विद्यार्थी सेल चे युवा नेते विजय हजारे, ऑस्टिन सावरकर, जहीर खान तसेच राष्ट्रवादी टीम राजुराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.#Agitate