Top News

युवा वॉरियर्सच्या माध्यमातून युवकांना नेतृत्वाची संधी मिळेल:- जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे. #BJYM

भारतीय जनता युवा मोर्चा आवळगावची संघटनात्मक बैठक संपन्न.
ब्रम्हपुरी:- राज्याचे लोकनेते मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून भा.ज.यु.मो जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांची युवा संकल्प यात्रा सुरू आहे. या अंतर्गत भा.ज.यु.मो ब्रम्हपुरी शहरचाही बैठक मा.आशीषभाऊ देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी आशिषभाऊ देवतळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी भाजप आवळगाव अध्यक्ष देवनाथजी लोळे, जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, शहर अध्यक्ष कामगार आघाडी नेते मनीष रामील्ला, सोशल मीडिया तालुका सहसंयोजक पिंटूभाऊ आंबोरकर, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने