Top News

१८ महिने लोटूनही बांधकामाची देयके नाही. #Chandrapur


सुशिक्षित बेरोजगार अभियंते अडचणीत.
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभागामार्फत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना काम देण्यात आले. अंगणवाडी, किचन शेड बांधकाम पूर्ण करूनही मागील १८ महिन्यांपासून देयके मिळालेच नाही. त्यामुळे कंत्राटदार अडचणीत आले असून अनेकांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. त्यामुळे देयक त्वरित देण्याची मागणी महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत राबविण्यात आलेल्या अभियंता सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांना अंगणवाडी, किचन शेड‌ व अंगणवाडी संरक्षण भिंत बांधकामाचे काम देण्यात आले होते. विहित मुदतीमध्ये काम पूर्ण करण्यात आले. मात्र मागील १८ महिन्यांपासून त्यांचे देयके देण्यातच आले नाही. बांधकामाची प्रशासकीय मान्यता न घेता जिल्हा परिषदेने कार्यारंभ आदेश देऊन बांधकाम पूर्ण करून घेतल्याचेही निवेदनात म्हटले आहे. देयके मिळत नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहे. काहींनी कर्ज घेऊन बांधकाम केले. त्यामुळे कर्जावरील व्याज सातत्याने वाढत आहे. त्यामुळे देयके त्वरित देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने