डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय, बंधुता आणि स्वातंत्र या त्रिसूत्रीतून समाजाला न्याय दिला:- आ. किशोर जोरगेवार. #Chandrapur

Bhairav Diwase

धम्मचक्र अनूप्रवर्तन दिना निर्मीत्य पवित्र दिक्षा भुमीला भेट देत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- भारतनत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय, बंधुता आणि स्वातंत्र या त्रीसुत्रितून देशाच्या शेवटच्या मानसाला न्याय देणारे संविधान देशाला बहाल केले. त्यांच्या संविधानामूळेच मानसाला मानूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. #Adharnewsnetwork

धम्मचक्र अनूप्रवर्तन दिना निमित्य आज आमदार किशोर जोरगेवार यांनी पवित्र दिक्षाभुमीला भेट देत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन मानवंदना दिली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे पंकज गुप्ता, राशिद हुसेन यांच्यासह कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
यावेळी भावना व्यक्त करतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर येथील दिक्षाभुमी ही भारतातील बौध्द धर्मीयांचे प्रमूख बौध्द तिर्थ स्थळ आहे. जगामध्ये केवळ दोन ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदिक्षा दिली. त्याच चंद्रपूर येथील पवित्र दिक्षाभुमीचा समावेश आहे. या ठिकाणी 65 वर्षापूर्वी म्हणजेच 16 ऑक्टोबर 1956 रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 3 लाखापेक्षा अधिक अनूयायांना नवयान बौध्द धम्माची दिक्षा दिली होती. त्यानंतर ऐतीहासीक धम्म क्रांती घडली अशी इतिहासात नोंद आहे. या पवित्र दिक्षाभुमीच्या विकासासाठी माझे प्रयत्न सुरु आहे. पहिल्यास अधिवेशनात दिक्षाभुमीच्या विकासासाठी मोठा निधी देण्याची मागणी मी केली आहे. यासाठी माझा सातत्याने पाठपूरावाही सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले.