दीपक चहरची भर मैदानात प्रेयसीला लग्नाची मागणी. #Deepakchahar

Bhairav Diwase

बोटात अंगठी घालत प्रेक्षकांच्या साक्षीने साखरपुडा.

चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याने गुरुवारी पंजाब किंग्जविरुद्धचा सामना संपल्यानंतर मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेयसीला फिल्मी स्टाईलमध्ये मागणी घातली.
प्रेयसीने होकार देताच दीपकने तिच्या बोटात अंगठी घालत प्रेक्षकांच्या साक्षीने साखरपुडाही उरकून घेतला.
पंजाब किंग्जविरुद्धचा सामना चेन्नई सुपर किंग्जने 6 विकेट्स गमावला. चेन्नईचा पराभव झाला असला तरी वेगवान गोलंदाज दीपक चहर याने मात्र प्रेयसीला जिंकले. सामना संपताच दीपक प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेल्या प्रेयसीजवळ गेला आणि गुडघ्यावर बसून त्याने तिला मागणी घातली. प्रेयसीनेही होकार देताच दीपकने तिच्या उजव्या हाताच्या बोटात अंगठी घातली. यावेळी उपस्थित खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवून दोघांचे अभिनंदन केले.