💻

💻

सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते गोंडपिपरी तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण. #Gondpipari


चेक बोरगाव येथे नव्याने झाली हक्काची अंगणवाडी.
गोंडपिपरी:- दि. २४ ऑक्टोबरला कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांचा दौरा जिल्हा परिषद सदस्या सौ. स्वाती वडपल्लीवार यांच्या आग्रहाने गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगाव, धानापूर ग्रामपंचायत येथे झाला. त्यात चेक बोरगाव येथे रोड चे भूमिपूजन, बोअरवेल चे उद्घाटन व अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर धानापूर येथे आरो प्लांटचे भूमिपूजन करण्यात आले.
स्थानिक सरपंचांनी गोंडपिपरी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या रोड साठी विकास निधी व गावंतर्गत विकास कामांची मागणी केली असता, जेवढे जास्त सहकार्य होईल तेवढे जास्त करू व पशुसंवर्धन विभागाची मागणी आजच मंजूर झाली असे जाहीर आवाहन करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच सचिव असता बाकी संपूर्ण नागरिकांनी जबाबदारी स्वतःवर घेतली तर आणि तरच ते सर्वांगीण दृष्ट्या विकसित होऊ शकते असे प्रतिपादन सभापती सुनील उरकुडे यांनी केले.

सदर कार्यक्रमाला सौ स्वाती वडपल्लिवार जी. प. सदस्या, सुदर्शन कोवे सरपंच चेकबोरगाव, जोगेश्वर उपासे उपसरपंच, माधुरी सिडाम सरपंच खरारपेठ, कोरबेते सरपंच गणेश पिंपरी, बालाजी चापले उपसरपंच, बबन निकोडे भाजपा तालुकध्यक्ष गोंडपीपरी, नानाभाऊ येल्लेवार भाजपा नेते, रामदास शेंडे, रमेश दिनगलवार, संजय कोनावार, वर्षा शेंडे, सुष्मा झाडे, रजिता आत्राम, जानकिरानजी झाडे, संजय वडस्कर, दत्तुजी धुडसे व समस्त प्रतिष्ठीत नागरीक प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत