🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

भटक्या जमातीच्या वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादा आता १ लाख रुपये; भटक्याविमुक्त जमातीच्या मागणीला यश. #Jiwati(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची यापूर्वीची रुपये 25 हजार रु. थेट कर्ज योजनेची मर्यादा रुपये १ लाख पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली असून वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातील रिक्त पदे भरण्यास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तत्वत मंजुरी देण्यात आली आहे रिक्त पदासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश यावेळी श्री वडेट्टीवार यांनी दिले आल इंडिया बंजारा टायगर्स संलग्न भारतीय राष्ट्रीय काॅग्रेस यांच्या मागणी नुसार वसंतराव नाईक महामंडळ ची कर्ज मिळण्यासाठी मर्यादा 2 लाख रु करावी अशी मागणी बहुजन विकास मंत्री वड्डेटीवार यांना निवेदन दिले होते कर्ज देत असतांना कोणतीही सरकारी नोकरीचा साक्षीदार असु नये व महामंडळ मधील रिक्तपद भरणे अध्यक्ष निवड करणे यासारखे निवेदन साहेबांना दिले होते त्यानुसार आज संचालक बैठकीत निर्णय घेत मंत्री मोहदयाने १ लाख रु कर्ज देण्याचे मंजुरी देण्यात आली आहे.#Jiwati

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत