🙏


🙏✍️

नागाने सस्याचे सोळा पिल्ले गिळले अन ओकलेही. #Snake #snakenews

चंद्रपूरात घडली विचित्र घटना.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात विचित्र घटना घडली. नाग सापाने सस्याला चावा घेऊन त्याला ठार केले अन त्या सस्याचे सोळा पिल्ले गिळले. सर्पमित्राने जेव्हा सापाला पकडले तेव्हा सापाने सस्याची पिल्ले ओकलीत.
ही घटना करवन येथिल दिवाकर चौधरी यांनी घरी घडली. मुल तालुक्यातील करवन या गावातील दिवाकर चौधरी यांचे घरी एका साडेपाच फुट लांबीच्या नाग सापाने पाळीव सस्याला ठार केले . त्याचे सोळा पील्ले गिळले. घटनेची माहीती मिळताच मुल येथील संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मयसिंह झिरे. दिनेश खेवले, अक्षय दुम्मावार यांनी घटना स्थळी जाऊन सुरक्षीतपणे नाग सापाला पकडले. नागाला पकडताच त्याने गिळलेले सस्याचे सोळा पील्ले बाहेर काढले. कोणतेही भक्ष्य गिळलेल्या सापाला पकडल्या नंतर तो साप खाल्लेले भक्ष्य बाहेर काढतो. ही सांपाची नैसर्गीक प्रतीक्रीया आहे. या घटनेची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत