अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा पोंभुर्णाची कार्यकारिणी गठित. #Pombhurna

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारिणी गठित करण्यासाठी आज पत्रकार भवन येथे एका बैठकिचे आयोजन करण्यात आले.
बैठकीला अभाअंनिस चंद्रपूर जिल्हा संघटक अनिल दहागावकर जिल्हा सहसचिव अनिल लोणबले दिलीप मॅकलवार सर महेंद्र शेडमाके साहेब एड रंजीत खोब्रागडे आदि मान्यवर तथा तालुक्यातील सामाजिक युवा कार्यकर्ते उपस्थित होते. पोंभुर्णा तालुक्यातील अनेक गावात बुवाबाजी ला पेव फुटले आहे. महाराज कडुन गावागावात भोडिभाबळ्या जनतेची दिशाभूल करुन लोकांची लुट करण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे याला आडा घालण्यासाठी पोंभुर्णा तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रयत्न सुरू आहेत यासाठी पोंभुर्णा तालुक्यात कार्यकारिणी चे गठन करण्यात आले. या समितीच्या माध्यमातून गावागावात जनजागृती करण्यात येणार आहे.अंधश्रध्दा निर्मुलनाचे काम करण्यात येणार आहे.
कार्यकारिणी पुढिलप्रमाणे अध्यक्ष अमित पाल, संघटक विनोद मारशेट्टीवार, सचिव प्रशांत झाडें, उपाध्यक्ष महेंद्र शेडमाके, उपाध्यक्ष सुखलाल खोब्रागडे,प्रशिद्धी प्रमुख अविनाश वाळके, कोषाध्यक्ष भोलेनाथ कोवे, सहसचिव संतोष गेडाम, सह संघटक विकास रामटेके, सल्लागार दिलीप मॅकलवार, सल्लागार ॲड. रंजीत खोब्रागडे, युवा संघटक श्रीकांत शेंडे, सदस्य सुनील पाल, विकास महामंडळे, फुल्ल दास चुदरी नुतन कार्यकारिणी चे अभिनंदन करण्यात आहे.