Top News

"पाणी अडवा पाणी जिरवा" उपक्रमा अंतर्गत आदर्श ग्राम घाटकुळने बांधला वनराई बंधारा. #Pombhurna

(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर   
पोंभुर्णा:- दिनांक 27/10/21 ला रोज बुधवारला सकाळी 8 वाजता ग्रामपंचायत घाटकूळ व महात्मा जोतिबा फुले विद्यालय घाटकुळ ता. पोंभुर्णा या विद्यालयाकडून सिमेंट चुंगड्यामध्ये रेती माती टाकून शेतीला, जनावरांना खूप उपयुक्त "पाणी अडवा पाणी जिरवा" अंतर्गत वनराई बंधारा बांधण्यात आला. 
    बंधारा बांधण्याच्या या प्रक्रियेत गावचे प्रथम नागरिक गावचे सरपंच सुप्रीम गद्देकर सचिव खुशाब मानपल्लीवार यांच्या पुढाकाराने, पंचायत समिती सदस्य विनोद भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आणि प. समितीचे बी.डी.ओ. मरसकोल्हे मॅडम यांच्या आदेशानुसार महत्वपूर्ण बंधारा गावच्या पश्चिमेकडील नाल्यावर बांधण्यात आला. बंधारा पूर्ण करण्याला विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रफुल निमसरकार, विद्यालयाचे शिक्षक किशोरकुमार ठाकरे, रामकृष्ण चनकापुरे, राजेंद्र खोब्रागडे, विठ्ठल राजूरकर, तथा कर्मचारी उमाकांत मडावी, ऋषी पेरकर, भोजराज देवाळकर,  घाटकूळच्या उपसरपंचा सौ. शितल पाल तथा समस्त सदस्य, रोजगार सेवक वामन कुद्रपवार, स्वच्छताग्रही राम चौधरी, मॅजिक बसचे समन्वय संघटक निखिल देशमुख, आकाश देठे, तालुका समन्वयक धर्मेंद्र घरत आणि विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने