धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सभापती सुनील उरकुडे यांनी केले विकासकामांचे भूमिपूजन. #Rajura

Bhairav Diwase
कोलगाव ग्रामपंचायतला उभारले जाईल स्वागत गेट.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील सदा दुर्लक्षित राहिलेले गाव म्हणजे कोलगाव या गावात गेल्या पंचवार्षिक पासून पुरुषोत्तम लांडे यांच्या परिश्रमाने भाजप प्रणित सत्ता ग्रामपंचायत मध्ये आणि लांडे यांनी गावाच्या विकासासाठी निरंतर प्रयत्न करत वरिष्ठ सभागृहाच्या लोकप्रतिनिधींकडे सारख्या मागण्या करून एका मागून एक विकासकामांची शृंखला लावली. मग पोहोच मार्गाचे डांबरीकरण असो व गावंतर्गत विकासकामे असो, आणि त्यांना साथ म्हणून सुनिल उरकुडे कृषी व पशुसंवर्धन सभापती जि. प चंद्रपूर यांनी त्यांच्या प्रत्येक मागणी कडे जातीने लक्ष देत त्यांना गाव विकासात सदैव सहकार्य केले. #Adharnewsnetwork
त्यातलाच एक उपक्रम म्हणून उपसरपंच पुरुषोत्तम लांडे यांच्या मागणीला मान देत सभापतींनी जिल्हा निधींअंतर्गत स्वागतगेट मंजूर करून दिले आणि त्या कामाचे भूमिपूजन धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पार पाडण्यात आले

त्याप्रसंगी कोलगावचे सरपंच सौ. अनिता सुधाकर पिंपळकर, उपसरपंच पुरूषोत्तम रामदास लांडे, सदस्य अक्षय गजानन निब्रड, सदस्य सौ. पुष्पा रवींद्र झुंगरे, सदस्य सौ ममता प्रकाश पोतराजे, व गावातील ज्येष्ठ नागरिक गिरिधर पोतराजे, रामदास उपरे, लक्ष्मण आगलावे, रमेश उरकुडे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी नागरिकांनी सभापती उरकुडे यांचे आज पर्यंतच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले व समोर असच सहकार्य असावे अशी आशा व्यक्त केली.