जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

राजुरा-पोवनी रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रास्ता रोको आंदोलन.#Rajura

उपविभागीय अभियंता यांचे आठ दिवसात काम सुरु करण्याचे आश्वासन; शेकडो ट्रकांच्या लांब रांगा


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा : राजुरा-पोवनी-कवठाळा मुख्य मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरून चालणे कठीण झाले आहे. यात सास्ती टी पॉईंट ते रामपूर बसस्टँड पर्यंत धुळीचे लोंढे उडत असल्याने रामपूर येथील नागरिकांचे जगणे कठीण झाले असून हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे. या मागणीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राजुराच्या वतीने रामपूर येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पंधरा दिवसापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष स्वप्नील बाजुजवार यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते, मात्र बांधकाम विभागाने केवळ पांढरी गिट्टी टाकली असून त्यावर पानी मारले नसल्याने धुळीचे लोंढे उडत असून रामपूर परिसरातील नागरिकांच्या घरात धुळीचे थर साचत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. येथील जनतेला उद्भवत असलेल्या समस्या लक्षात घेता राजुरा-पोवनी-कवठाळा मार्गाचे काम तात्काळ सुरु करावे, रस्त्याचे बांधकाम होईपर्यंत सास्ती टी पॉईंट ते रामपूर बसस्टँड पर्यंतच्या रस्त्यावर सकाळ संध्याकाळ टँकरद्वारे पाणी मारावे, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्याचे काम तात्काळ सुरु करण्याच्या मागण्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुराच्या वतीने एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, यावेळी वेकोलीची ट्रकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडून आंदोलकांशी संपर्क साधून आठ दिवसात काम सुरु करण्याचे आश्वासन दिले असता आठ दिवसाच्या आत काम सुरु न झाल्यास यापेक्ष मोठे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष देरकर यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँगेस तालुका अध्यक्ष संतोष भाऊ देरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष रखीब भाई शेख, युवक तालुकाध्यक्ष असिफ सय्यद, युवक शहर अध्यक्ष स्वप्नील बजूजवार, शहर उपाध्यक्ष सुजित कावळे, जहीर खान, शहार कार्याध्यक्ष संदीप पोगला, युवक शहर उपाध्यक्ष आशिष गेडाम, गौरव कोडापे, गोपाल मडावी, ऑस्टिन सावरकर,
रामपुर येथील लता डकरे, विजू हजारे, प्रफुल शेलवटे, रुशिकेश डकरे, विनोद पाईपारे, निखिल कावले, मनोज गुडेकर, अंकित वाळके, संचित वाळके, अजित काळे, धिरज खणके, आदित्य गावंडे उपस्थित होते.#Rajura

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत