Top News

रात्री नऊ वाजताच्या सुमारास बंद पडलेलं व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम रात्री चार वाजता झालं सुरू. #WhatsApp #Facebook #Instagram

मुंबई:- फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजर आता ऑनलाइन सेवा सुरू झाली आहे. रात्री नऊ वाजता बंद पडलेली ही सेवा रात्री चार वाजता सुरू झाली.
भारतात फेसबुकचे 410 दशलक्षाहून अधिक, व्हॉट्सअ‍ॅपचे 530 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. इन्स्टाग्रामचे भारतात 210 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे.
दरम्यान अनेक तज्ज्ञांनी सायबर हल्लाची शक्यता वर्तवली आहे. सोशल मीडिया साईट्स डाऊन होण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. पण तब्बल सात तास या सोशल मीडिया साईट्स डाऊन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अनेकांनी हा एक सायबर हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पण या मागचं नेमकं खरं आणि अधिकृत कारण काय ते अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी गैरसोय झाल्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. आज झालेल्या व्यत्ययाबद्दल क्षमस्व. मला माहित आहे की, तुम्ही आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात. तुम्ही काळजी असलेल्या लोकांशी जोडलेले राहण्यासाठी, ही सेवा पूर्ववत झाली आहे, अशी पोस्ट झुकरबर्ग यांनी केली आहे.
समाज माध्यम प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर जगभरातील अनेक ठिकाणी ठप्प झाले होते. यामुळे यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. याबाबत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकने दिलगिरी व्यक्त केली होती. माफ करा, काहीतरी चुकीचे झाले आहे. आम्ही ही समस्या सोडवण्याचे काम करत आहोत. लवकरच सर्व काही सुरळीत होईल, असं फेसबुकने आपल्या मॅसेजमध्ये म्हटले होते. दरम्यान, पहाटे चार वाजता मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी गैरसोय झाल्याबाबत दिलगिरी व्यक्त करत ही सेवा पूर्वत झाल्याची पोस्ट केली.
फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजर रात्री नऊ वाजता बंद पडल्यानंतर वेब आणि स्मार्टफोन या दोन्ही ठिकाणी तिन्ही अ‍ॅप चालत नव्हती. त्यामुळे यूजर्सना काय झाले तेच समजत नव्हते. त्यामुळे पुन्हा यूजर्स फोन मेसेजकडे वळलेत. मेसेज पाठविण्याकडे रात्रीपासून कल दिसून येत होता. फोन मेसेजच्या माध्यमातून संपर्क सुरू होता.
फेसबुकचे वाढते बाजारमूल्य....

दरम्यान व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम सेवा खंडित झाल्यानंतर ट्विटरवर मिम्सचा पाऊस पडला आहे. फेसबुकचा वार्षिक महसूल २०१८ मध्ये ५६ अब्ज डॉलरचा होता. तो आता दुपटीपेक्षा जास्तीने वाढून ११९ अब्ज डॉलरवर पोचला आहे. २०१८ मध्ये फेसबुकचे बाजारमूल्य ३७५ अब्ज डॉलरवर होते. ते आता जवळपास १ ट्रिलियन डॉलरवर पोचले आहे.
सर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने