चंद्रपूर:- देवतारी त्याला कोण मारी..?ही म्हण आपण नेहमी ऐकतो.पण,ही मदत सर्व अपघातग्रस्तांना मिळते, असे नाही. बरेच लोकं अपघात झाल्यावर बघ्याची भूमिका घेतात. बोटावर मोजण्या इतकेच लोकं संवेदनशील असतात. असे लोकं अपघातस्थळी असले की मग एखाद्याला मदत मिळते. परिणामी त्या अपघातग्रस्तावर उपचार होऊन त्याचा जीव वाचतो.असेच काही 2 दिवसांपूर्वी बायपास रोडवर घडले. एका पोलिसाचा अपघात झाला,आणि मागून येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या पोलिसाला मदतीचा हात दिला. विशेष म्हणजे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी त्या अपघातग्रस्त पोलीसावर स्वतःच्या क्लिनिकमध्ये नेऊन उपचार केले.
असा झाला अपघात....
बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत सहा. फौजदार भुजंगराव कोवे 2 दिवसापूर्वी कर्तव्य बजावून चंद्रपूरला परतत असतांना रय्यतवारी कॉलरी बायपास रोड येथे एक कुत्रा त्यानां अचनक रस्त्यावर आडवा झाला. कुत्र्याला वाचविण्याच्या नादात भुजंगरावाचा तोल गेला आणि ते कोसळले. यात त्यांच्या डोक्याला मार लागला आणि ते रक्तबंबाळ झाले. याचवेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महासचिव सुभाष कासंगोट्टुवार, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे चारचाकीतून प्रवास करीत होते. त्यानी हे दृश्य बघितले,सर्वानी लगेच खाली उतरून भुजंगराव यांना धीर देत. डॉ. गुलवाडे हॉस्पिटल येथे आणले. डॉ. गुलवाडे यांनी त्यांचेवर उपचार करीत डोक्याला 2 टाकेही लावले. या प्रकारामुळे सहा. फौजदार भुजंगराव कोवे यांचा जीव भांड्यात पडला.
जीव प्रिय असेल तर, हेल्मेट वापरा:- डॉ गुलवाडे.
पोलिसबंधु भुजंगराव कोवे यांचे वाहन घासत गेले.त्यांच्या डोक्याला मार लागला.हेल्मेट असल्याने जीवघेणी दुखापत झाली नाही. अपघात कधीही होऊ शकतो,म्हणून जीव प्रिय असेलतर हेल्मेट वापरा, असे आवाहन महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले आहे.