Top News

अज्ञातांनी रेल्वेमार्गावर ठेवले सिमेंट स्लिपर. #Warora


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
वरोरा:- नवी दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर वरोरा शहराच्या जवळील चिकणी गावानजीक अज्ञातांनी सिमेंट स्लीपर ठेवला होता. ही बाब वेळीच रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आल्याने पोलिसांच्या उपस्थितीत सिमेंट स्लीपर हटविण्यात आले. या दरम्यान एकही रेल्वे या रुळावरून गेली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
वरोरा शहरानजीक चिकणी गावाजवळून नवी दिल्ली चेन्नई रेल्वेमार्गावर लोखंडी प्लेट ठेवण्यात आली होती. दरम्यान, रेल्वेगाडी आली. हादऱ्यामुळे लोखंडी प्लेट खाली पडली. याबाबतची सूचना रेल्वे गाडीच्या पायलटने रेल्वे स्टेशन वरोरा येथे दिली. त्यामुळे रेल्वे प्रशासनात खळबळ माजली. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलीस व रेल्वे अधिकाऱ्यांनी चिकणी गावाजवळ जाऊन नवी दिल्ली चेन्नई रेल्वेमार्गाची पाहणी केली असता, रेल्वेमार्गावर सिमेंटचे स्लीपर आढळून आले. ते सिमेंटचे स्लिपर तत्काळ हटविण्यात आले. या दरम्यान, एकही प्रवासी अथवा मालवाहतूक करणारी रेल्वे गेली नसल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे मानले जात आहे. सिमेंट स्लीपरचे वजन बघता ते उचलण्याकरिता पाचपेक्षा अधिक व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
त्याने दाढी काढली, स्वतः जाळ्यात आला....

घटनेच्या परिसरात दाढीधारी इसम फिरत असल्याची माहिती समोर आली. त्या इसमाला आपल्यावर संशय आला असल्याची चिंता वाटली. आपण पकडले जाऊ, म्हणून त्याने रात्री गावातील न्हाव्याकडे जाऊन नीटनेटकी वाढवलेली दाढी काढून घेतली. त्यावरून त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. कधीही दाढी काढली नाही अन् दाढी काढताच तो जाळ्यात अडकल्याची खमंग चर्चा परिसरात केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने