Top News

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा विरोधात निषेधार्थ आंदोलन. #Chandrapur.


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेने माझ्यावर हल्ला:- महेश मेंढे.
चंद्रपूर:- बॅनर वर माझा फोटो का टाकला नाही म्हणून पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या इशाऱ्यावर कांग्रेस पक्षात असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मला मारहाण केली, याबाबत मी पालकमंत्री वडेट्टीवार व मारहाण करणाऱ्या विरोधात पक्षप्रमुख सोनिया गांधी व महाराष्ट्र कांग्रेस कमिटी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी चे अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष महेश मेंढे यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?

१३ नोव्हेंबरला ऊर्जामंत्री नितीन राऊत हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या फलकावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे छायाचित्र न टाकल्याच्या रागातून काँग्रेसचे विधानसभेचे माजी उमेदवार महेश मेंढे यांना सीटीपीएसच्या विश्रामगृहाजवळ आणी कार्यक्रम स्थळी मारहाण केल्याने काँग्रेसच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात एक गट सक्रिय असून, यापूर्वीही एका गटाने शहरात लावलेल्या फलकावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा फोटो लावला नव्हता. त्यामुळे याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली. महेश मेंढे हे नेहमीच वडेट्टीवारविरोधी भूमिका घेत असल्याने वडेट्टीवार समर्थकांमध्ये रोष आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत शनिवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
यावेळी त्यांचे स्वागतफलक लावण्यात आले. मात्र, मेंढे यांनी लावलेल्या स्वागत फलकावर पालकमंत्रीचा फोटा टाकण्यात आला नाही. त्यामुळे कांग्रेस कार्यकर्त्यांनी मेंढे यांना जाब विचारला. यावेळी बाचाबाची होऊ प्रकरण हातघाईवर आले. यावेळी मेंढे यांना कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे."
काय म्हणाले कॉंग्रेस नेते महेश मेंढे.

13 नोव्हेंबर ला राज्याचे ऊर्जामंत्री व कांग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांचा चंद्रपूर दौरा होता, मात्र राऊत यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या स्वागत बॅनरवर पालकमंत्री वडेट्टीवार यांचा फोटो नसल्याने त्यांनी गुंड प्रवृत्तीचे संदीप सिडाम, प्रवीण पडवेकर व मोहन डोंगरे यांना मला मारहाण करण्यासाठी पाठविले.
मंत्री राऊत यांच्यासमोर माझ्यावर पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की केली, व कार्यक्रम स्थळी मला बेदम मारहाण करण्यात आली असा आरोप महेश मेंढे यांनी करीत या सर्व मारहाणीचे सूत्रधार स्वतः पालकमंत्री विजय वडेट्टीवार आहे असा आरोप लावला. मागील 2 विधानसभा निवडणुकीत कांग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली, त्यानंतरही मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करीत आहो मात्र माझे काम पक्षातील काहींना पचत नसल्याने त्यांनी अहिंसक पक्षात हिंसक वृत्तीला समोर करून मला मारहाण करायला लावली. असा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर थेट आरोप महेश मेंढे यांनी केला.
15 नोव्हेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या विरोधात महाराष्ट्र कांग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाने निषेध आंदोलन केले. महेश मेंढे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, संदीप सिडाम, प्रवीण पडवेकर व मोहन डोंगरे यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने