ट्रक च्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार. #Accident #death

Bhairav Diwase
गडचिरोली:- दि. 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 07 वाजताच्या सुमारास पोलिस स्टेशन समोर एका अपघातात एक ट्रक वाहन क्रं. MH 12 MV 0349 च्या धडकेत एक व्यक्ती जागेवरच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव दुर्गेश नंदनवार असून ते सुंदरम फायनान्स कंपनी मध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होते.
कंपनी मधून सायंकाळी सुट्टी झाल्यावर पत्नी सोबत बाजारात शॉपिंग करायला निघालेला दुर्गेश आज पोलिस स्टेशन समोर असलेल्या दुकानदारांच्या अतिक्रमण आणि बिघडलेल्या वाहतुकीचा बळी ठरला आहे.
धडक देणाऱ्या ट्रक चा ड्रायव्हर घटनास्थळवरून फरार झाला असून,मृत दुर्गेश हा ट्रक च्या चाकाखाली दबून पडलेला होता. अपघाताच्या ठिकाणी रस्त्याची वाहतूक एक तासा पर्यंत विस्कळीत झाल्याने संपूर्ण वाहतूक एकाच मार्गाने करावी लागली होती. अपघात घडल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली होती.
मृतक दुर्गेश हा एक जागरूक नागरिक प्रमाणे हेल्मेट घालून च आपली मोपेड दुचाकी चालवत होता परंतु अतिक्रमण धारकांनी निर्माण केलेली रस्त्यावर ची अडचण, आज त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे विदारक वास्तव चित्र दिसून आले आहे. पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहे.