जाहिरात... Advertisement... विज्ञापन

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी यूनियन शाखा पोंभुर्णा यांच्या वतीने संवर्ग विकास अधिकारी यांचे अभिनंदन. #Pombhurna.


(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी यूनियन शाखा पोंभुर्णा यांच्या वतीने दिनांक २६/११/२०२१ ला पंचायत समिती पोंभुर्णा चे संवर्ग विकास अधिकारी साळवे साहेब यांनी पंचायत समिती पोंभुर्णा येथे पदभार स्विकारल्याबद्दल त्यांचे यूनियन च्या वतीने पुष्पगुच्छ देउन अभिनंदन करण्यात आले.

तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध अडचणी, समस्या याबद्दल निवेदन देउन चर्चा करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र ग्राम पंचायत कर्मचारी यूनियन चे अध्यक्ष विनायक सी. पु्ठावार, उपाध्यक्ष ठाकुरदास गवारे, सचिव अनिल नैताम तसेच सचिव व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत