गोंडपिपरी:- आगामी नगर पंचायत निवडणुकी संदर्भात प्रशांत कदम शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रपूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे,स्वप्नील काशीकर यांच्या नेतृत्वाखाली गोंडपिपरी येथे शिवसेना पदाधिकारी आणि अधिकृत उमेदवार यांची बैठक आयोजित करण्यात आली.येणारी गोंडपिपरी नगर पंचायत शिवसेना स्वबळावर लढणार असून गोंडपिपरी नगर पंचायतीच्या निकाला वरुन येणाऱ्या राजुरा विधानसभेचा आमदार शिवसेनाचा राहील शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रपूर जिल्हा प्रश्नांत कदम यांनी प्रतिपादन केले.
शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी या बैठकीला संबोधित करताना आगामी गोंडपिपरी नगर पंचायत निवडणूक हि गोंडपिपरीच्या समान्य जनतेची असून ही लढाई जन शक्ती विरुद्ध धन शक्ती अशी आहे परंतु आपण सर्व मिळून जन शक्ती चा विजय नक्की करु असे मत व्यक्त केले. आपल्या पक्षा तर्फे इतिहास घडवणार असा विश्वास शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदिप करपे यांनी दर्शविला.शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांनी संपूर्ण उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले.यावेळी सुनील संकुलवार,संजय माडुरवार,सरपंच तरुण उमरे,शैलेश बैस,अशपाक कुरेशी, रियाज कुरेशी,आनंदराव गोहणे, रमेश नायडू, नरेंद्र इंगोले, तुकाराम सातपुते, बांबोडे,पेंढारकर, दीपक नेवारे,बब्बू पठाण,नाना मडावी,बालू झाडे,बळवंत भोयर, प्रमोद तुंमडे,सचिन नगारे,विलास एलमुले,सुनील भोयर,मनोज मडावी,राजू झुंगरे,विलास एलमुले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.