Top News

रेती तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या ताब्यात. #Rajura



(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगतसिंग वधावन, विरुर स्टेशन
विरुर स्टे:- मागील काही दिवसापासून विहिरगाव मूर्ती नाल्यावरील रेती तस्करांनी धुमाकूळ घातला होता. यातच तहसीलदार हरीश गाडे यांच्या नेतृत्वात भरारी पथक नेमण्यात आले त्या पथकांना सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास विहिरगाव रेती घाटावर दोन ट्रॅक्टर पकडण्यात महसूल विभागाला यश आले.
राजुरा तालुक्यातील येत असलेल्या विहीरगाव, नलफडी, मूर्ती, विरूर ,सिंधी, खांबाळा, सोनुरली, बेरडी, डोंगरगाव, लहान मोठे नाल्यांमध्ये मागील वरून राजाने दमदार बॅटिंग केल्यामुळे नाले रीतीने तुडुंब भरले आहे. ह्यातील बहुतेक नाले जंगलातून वाहत येत असल्याने महसुली नाल्यात रेतीचा मोठा साठा पाहायला मिळत आहे. सध्या हेच नाले तस्करासाठी वरदान ठरत आहे या नाल्यात तस्करांनी अक्षरशा हौदोस घातला आहे. विशेष म्हणजे, रेती तस्करीचा गोरखधंदा मागील काही महिन्यापासून अविरतपणे सुरू आहे. यामुळे रात्री व भर दिवसा रेतीची सर्रासपणे वाहतूक चालू होती त्यामुळे रेती तस्करांच्या मुजोऱ्या वाढतच होत्या.
अशातच महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी धाड टाकून विहीरगाव रीती घाटावर जाऊन रेती उपसा करीत असताना रंगेहात पकडण्यात महसूल विभागाला यश आले. सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान एम एच 40 एल 0754 ट्रॅक्टर व ट्राली, एम एच 32 ए 1086 ट्रॅक्टर व ट्रॉली व राजुरा तहसील कार्यालय येथे दोन्ही ट्रॅक्टर जमा करण्यात आले. सदर ट्रॅक्टर जगन गोप राजुरा यांच्या मालकीची असल्याचे समजते.
सदरची कारवाई हरीश गाडे तहसीलदार राजुरा यांच्या नेतृत्वात निरंजन गोरे मंडळ अधिकारी, सुभाष साळवे मंडळ अधिकारी, तलाठी डी.एम शेंडे, राहुल श्रीरामवार, दिगंबर गेडाम, मारोती आत्रे यांनी केली.#Rajura

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने