चंद्रपूर:- राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून आता आणखी एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चंद्रपूरमध्ये एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. शहारतील प्रमुख आगारामध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून काम करणाऱ्या सत्यजित ठाकूर यांनी विष प्राशन करून जीवन संपवलं आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
व्हिडिओ न्यूज पहा...
आत्महत्या केलेला कर्मचारी सत्यजित ठाकूर हा ३४ वर्षांचा होता आणि चारच महिन्यांची मुलगी आहे. त्यांची पत्नी नागपूरला राहते. दोनच दिवसांपूर्वी ते ब्रह्मपुरीला आले होते. त्यांचा फोन स्वीच ऑफ लागल्यानंतर पत्नीला शंका आली. त्यानंतर पत्नीने त्यांच्या सहकाऱ्यांना कॉल केले. तेव्हा सहकाऱ्यांनी घरी जाऊन पाहिले असता हा प्रकार समोर आला आहे.