Top News

4 जवानांचा मृत्यू; 3 जवान जखमी. Death

छत्तीसगड:- मिळालेल्या वृत्तानुसार छत्तीसगडमधील सुकमा येथून एक मोठी बातमी घटना घडली आहे. जिल्ह्यातील मराईगुडा येथील लिंगानापल्ली कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने सहकारी जवानांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर 3 जवान गंभीर जखमी झाले आहे. जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
जिल्ह्यातील मरईगुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लिगमपल्ली सीआरपीएफ 50 बटालियन कॅम्पमध्ये ही घटना घडली. मध्यरात्री 3 वाजून 25 वाजण्याच्या सुमारास जवानानं हा गोळीबार केला आहे.
नेमकं काय घडलं....

रितेश रंजन या जवानानं मध्यरात्री 3 वाजून 25 वाजण्याच्या सुमारास आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केला आहे. या घटनेत 4 जवानांचा मृत्यू तर 3 जवान जखमी झाले आहेत. या जखमी जवानांवर तात्काळ भद्राचलम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने