💻

💻

सेफ्टी किटचे अतिरिक्त शुल्क घ्याल, तर याद राखा:- विशाल निंबाळकर #Chandrapur

भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर तर्फे देण्यात आला सतर्कतेचा इशारा
चंद्रपूर:- सेफ्टी किट हा कंत्राटी कामगारांचा अधिकार आहे.त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारणे म्हणजे,त्यांची पिळवणूक करणे होय.कोरोनामूळे आधीच सारे होरपळले आहे.अश्यात कंत्राटी कामगारांना सेफ्टी किट साठी वेठीस धरले जात असेल तर,भाजयुमो हे खपवून घेणार नाही.अतिरिक्त शुल्क आकारत असाल तर याद राखा. असा इशारा भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी दिला आहे.

ओम भवन येथे शुक्रवार (17 डिसेंबर) ला महाराष्ट्र राज्य सेफ्टी किट वाटप या योजने अंतर्गत साहित्य पेटीचे वाटप सुरू होते. लाभार्थ्यांना साहित्य पेटी देण्याचे आमिष दाखवून अतिरिक्त शुल्क 100 रू तिथे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्ती कडून घेण्यात येत होते, या संदर्भातील तक्रार प्राप्त झाल्यावर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी ताबडतोब त्या स्थळी पोहचून तेथे काम करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यां सोबत चर्चा करून कंत्राटदाराला जाब विचारला आणी अतिरिक्त शुल्क न आकारण्यात यावे असे स्पष्ट केले आहे.लाभार्थ्यांनीं कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये असे त्यांनी सांगितले. कोणताही लाभार्थी या योजने पासून वंचित राहणार नाही,याची दखल भाजयुमो घेणार आहे.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष यश बांगडे, जिल्हा सचिव मनीष पिपरे, जिल्हा सचिव आकाश ठुसे, खेमराज भालवे, हर्षल मुळे, मंदार झाडे , अमन मारवे उपस्थित होते.ही योजना संपूर्ण महाराष्ट्रत सुरू आहे व प्रत्येक जिल्हा मध्ये असेच घोळ सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य लाभार्थी यांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत