जाहिरात... Advertisement... विज्ञापन

गोंडवाना विद्यार्थी संघटने नी विविध मागण्या करिता आमदार किशोर जोरगेवार यांना दिले निवेदन #Chandrapur

चंद्रपूर:- गोंडियन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था चंद्रपुर या संस्थेच ४ डिसेंबर ला एकदिवसिय अधिवेशना करिता प्रमुख पाहुने म्हणून चंद्रपुर चे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची उपस्थिति होती.
मंचावर उपस्थित श्रीमंत गोंडराजे विरेंद्रशाह आत्राम, संतोषसिंह रावत साहेब अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सह. बैंक चंद्रपुर, मनोजदादा आत्राम कार्यवाहक प्रदेशाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी, गजानन पा. जुमनाके युवा प्रदेशाध्यक्ष गों.ग.पा उपस्थित होते.
याच अधिवेशनात उपस्थित मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांना गोंडवाना विद्यार्थी संघटना चंद्रपुर यांनी खालील दिलेल्या मागणीचे निवेदन दिले.
१)चंद्रपुर जिल्ह्याची संस्थापक मॉ राणी हिराई यांचा पूर्णाकृति पुतळा अंचलेश्वर मंदिर परिसर येथे मांडण्यात यावा.

२)विदर्भातील पहिले शहिद राष्ट्रीय योद्ध्य वीर बाबुराव सेडमाके यांचा पूर्णकृति पुतळा पुलिस मुख्यालय रामनगर चौक येथे मांडण्यात यावा.

३)गोंडराजे खांडक्या बल्लाळशहा आत्राम यांचा पूर्णकृति पुतळा जटपुरा गेट येथे मांडण्यात यावा. या प्रमुख मागणी सह निवेदन दिले.
निवेदन देतांना सारंग कुमरे जिल्हाध्यक्ष, पलाश पेंदाम जिल्हाउपाध्यक्ष, गौरव मर्सकोल्हे सहसचिव, चंदू कुलमेथे सदस्य, वेदांत तोड़ासे सदस्य, श्रेया गावड़े सदस्य उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत