जाहिरात... Advertisement... विज्ञापन

रोडगुडा येथे गोर सेनेच्या वतीने संकल्प स्वाभिमान दिन साजरा #Jivati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील रोडगुडा येथे संकल्प दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सेवाभाया ठाणो येथे शांतीचे प्रतिक पांढरा ध्वजाचे रोहण करण्यात आले. त्यानंतर सेवालाल महाराज आणि वसंतराव नाईक साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
महानायक वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्वात प्रथम शपथ 5 डिसेंबर 1963 रोजी घेतली होती. महाराष्ट्राची विकास कामे झपाट्याने नाईक साहेबांच्या काळात झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक विश्वनाथ राठोड सर चंद्रपुर यांनी आपल्या मार्गदर्शनातून समाजाला पाच डिसेंबर ह्या दिवशी एकत्र येण्यासाठी सांगितले. या दिवशी समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भविष्यात कोणत्या पद्धतीने कार्य केले पाहिजे याविषयी चर्चा केली पाहिजे.
उद्घाटक म्हणून हरपणी अंजनाबाई भीमराव पवार, सभापती पंचायत समिती,जिवती उपस्थित होत्या. उदघाटनीय भाषणातुन जिवती तालुक्यातील विकास कामे झपाट्याने करणार असल्याचे सांगितले.प्रमुख वचारी माटी अशोक राठोड सर,प्रदेश अध्यक्ष , भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या भाषणातून महानायक वसंतराव नाईक साहेबांनी अकरा वर्षातं कशा पद्धतीने संविधानानुसार विकास कामे केली याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कुमारी किरण देविदास राठोड यांनी सुध्दा आपले विचार मांडले.
कवी राजेश राठोड यांनी गीत गायण करून सर्वांची मने जिंकली. प्रमुख अतिथी म्हणून दत्ता राठोड, पांडुरंग जाधव संचालक सहकारी मध्यवर्ती बँक संचालक चंद्रपुर, पंकज पवार राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष, भीमराव पवार सामाजिक कार्यकर्ता,सुदाम राठोड जय विदर्भ पार्टी,मेनीचंद राठोड जिल्हाध्यक्ष,तांडा सुधार समिती, मा.इंदल राठोड,संयोजक गोर सीकवाडी चंद्रपूर, ओम पवार भा.ज.पा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर या सर्वांचा विचार घेऊन समाज कार्य करने आवश्यक आहे, किसन राठोड सामाजिक ऋणकार्यकर्ता सेवादास नगर,म ठोंबरे भाऊ ,अरविंद चव्हाण बंजारा विकास फाउंडेशन अध्यक्ष, सुभाष जाधव, पवार सर, राठोड सर, दैवलागुडा नायक , सेवादास नगर तांडा,रामराव नायक पल्लेझरी तांडा, बालाजी नायक. कार्यक्रमाची प्रस्तावना बालाजी भाऊ जाधव,जिल्हा सचिव,गोर सेना यांनी मांडली. आभार प्रदर्शन पंडित भाऊ राठोड गोर सेना जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष राजुरा दिनेश राठोड ,गोर सेना शाखा अध्यक्ष गडचांदूर शाखा विजय चव्हाण, जिवती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता व सर्व मंडळी उपस्थित राहुन अभिमान दिन साजरा करण्यात आला, सूत्रसंचालक गणेश राठोड करमठोट गोर सेना प्रदेश उपाध्यक्ष मुख्यमंत्री शपथ दिनानिमित्त सर्व समाज बांधवांना सामाजिक जनजागृती करण्यात आली सर्व मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत