चिखलदरा येथे पार पडलेल्या टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील मुला मुलींनीची उंचं भरारी #Chandrapur

Bhairav Diwase

अमरावती:- १३ वी उप कनिष्ठ अंतर्गत १७ वी मुले आणि मुली आंतर जिल्हा टेनिस बाल क्रिकेट चॅम्पियनशिप चिखलदारा (अमरावती) ३०/११/२०२१ ते ०२/१२/२०२१ विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथे पार पडलेल्या टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील मुला, मुलीनची उंच उडी ग्रामीण आणि शहरी खेळाडूना वाव मिळावा, त्यांच्यात असलेली कला जिवंत रहावी यासाठी विक्की सर पेटकर (सचिव, चंद्रपूर जिल्हा टेनिस बाल क्रिकेट संघटना) या खेळासाठी निवड राष्ट्रीय कॉलेज विसापूर येथे करण्यात आली होती या निवड चाचणी मध्ये अध्यक्ष स्थान खान सर, विक्की पेटकर सर सचिव,आणि आदी मान्यवर उपस्थित होते.

या खेळासाठी विक्की सर यांनी ग्रामीण आणि शहरी खेळाड्डना आपली कला सादर करण्याची संधी दिली आणि त्यांनी नक्कीच संधीच सोन केलं अस म्हणायला काही हरकत नाही आणि या सर्व खेळाडूच कौतुक सर्व स्तरावरून होत आहे.

या प्रकारे विजेते तक्ता

उप कनिष्ठ संघ
चंद्रपूर शहर मुले - प्रथम क्रमांक
वरिष्ठ संघ
चंद्रपूर ग्रामीण मुली - प्रथम क्रमांक
चंद्रपूर शहर मुली - तृतीय क्रमांक
चंद्रपूर शहर मुले - तृतीय क्रमांक