💻

💻

गडचांदूर येथे संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी संपन्न #Korpana


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- संताजी महिला मंडळ यांच्या तर्फे गडचांदुर येथे तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
संताजी जगनाडे महाराज यांच्या तिथी नुसार पुण्यतिथी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला मल्यारपण आणि दिप प्रज्वलन करून करण्यात आली. संताजी जगनाडे यांच्या जीवनाबद्दल उपस्थितांना प्रबोधन करण्यात आले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याबाबत सरकार कळे मागणी संताजी महिला मंडळ तर्फे करण्याचे ठरविण्यात आले.
कार्यक्रमास सौ. मोना कलोडे, सौ. संगीता वैरागडे, सौ. हेमलता येरणे , सौ. प्रतिभा वैरागडे, सौ.प्रीती पोटदुखे, सौ. मनीषा बुटले, सौ. वर्षा बेले, सौ. शुभांगी मंगरुळकर सौ.रेश्मा येरणे, सौ. किरण गिरीपुंजे सह तेली समाज भगिनी उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत