💻

💻

गेवरा बुज येथे नागदिवाळी महोत्सव आयोजित #saoli

परिसरातील नागरिकांनी जास्तीत उपस्थित राहावे, आदिवासी बांधवांचे आव्हान
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- तालुक्यातील मौजा गेवरा बुज येथे माना आदिम जमात मंडळ व आदिवासी विद्यार्थी युवा संघटना विदर्भ ग्राम शाखा गेवरा बुज च्या वतीने दोन दिवसीय नागदिवाळी महोत्सव येत्या 29 डिसेंबर 2021 व 30 डिसेंबर 2021 ला आयोजित करण्यात येत आहे.
29 डिसेंबर रोज बुधवार ला सकाळी 6 वाजता परिसर स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात येईल.सकाळी 7 वाजता मिरवणूक व ध्वजारोहण कार्यक्रम रामनगर येथे करण्यात येत आहे. दुपारी 11 वाजता पाहुण्यांचे आगमन व स्वागत, प्रास्ताविक भाषणे होतील. व 12 वाजता पारंपरिक पद्धतीने मूठ पुजा व डहाके वादन कार्यक्रम घेण्यात येईल. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री.शरदराव धारणे सर से.नि.प्राचार्य वि.वि.विहिरगाव,अध्यक्ष मा. पी.एम. चौधरी साहेब से.नि.वनपरिक्षेत्र अधिकारी गेवरा ,उपाध्यक्ष मा. पी.के.घोडमारे सर से.नि.मुख्याध्यापक गडचिरोली यांना आमंत्रित केले आहे. संध्याकाळी दीप प्रज्वलन व शोभायात्रा मिरवणूक काढण्यात येईल. रात्रौ 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतील.
गुरुवारी दि.30 ला सकाळी ग्रामसफाई त्यानंतर मिरवणूक शोभायात्रा काढण्यात येईल. सकाळी 11 वाजता महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुपारी 3 वाजता मा. धारणे सर प्राचार्य विहिरगाव यांच्या अध्यक्षतेखाली समारोपिय कार्यक्रम घेण्यात येईल.
या नागदिवाळी महोत्सवाकरिता परिसरातील माना आदिवासी जमातीच्या नागरिकांनी प्रामुख्याने उपस्थित राहावे अशी विनंती आदिवासी माना जमात मंडळ गेवरा बुजचे अध्यक्ष श्री.विनायक वाकडे उपाध्यक्ष, श्री.गणेश चौधरी, सचिव कु.अभिनंदन घरत,कार्याध्यक्ष राजू नन्नावरे, सहसचिव संदीप शेरकुरे व गावातील गावकरी मंडळी निमंत्रित करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत