Top News

बार्टी मार्फत संविधान साक्षर अभियान #shindewahi

समतादुत कृपाली धारणे यांचा सामाजिक उपक्रम
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांची स्वायत् संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर संविधान साक्षर अभियान राबविण्यात येत असून चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नाचण भट्टी या गावी समतादूत कृपाली धारणे त्यांच्या मार्गदर्शनातून संविधान साक्षर अभियान 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संविधान साक्षर अभियानांतर्गत संविधानातील मूलभूत कर्तव्य व जबाबदारी या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम दि:१४/१२/२१ ला घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मिथुन कृष्णा रामटेके जिल्हा परिषद शाळा रत्नापुर होते यांनी आपल्या मार्गदर्शनातून गावकऱ्यांना आपले हक्क कर्तव्य व जबाबदाऱ्या या विषयावर सखोल असं मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच विद्याताई खोबरागडे उपसरपंच ग्रामपंचायत चे सर्व सभासद समाजाचे सचिव अध्यक्ष उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन आशिष खोब्रागडे यांनी केले तर आभार समतादूत कृपाली धारणे यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व युवा केंद्रातील सभासद, विद्यार्थी गावकरी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने