जिल्हा परिषद चेक आष्टा शाळेचा "स्थापना दिवस" विद्यार्थ्यांनी केला साजरा #Pombhurna

पोंभुर्णा:- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा ही दिनांक 2 डिसेंबर 1958 रोजी स्थापन झाली. दि. 2 डिसेंबर 2021 रोजी या शाळेला स्थापन होऊन 63 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी न चुकता शाळेचा स्थापना दिवस साजरा केला.
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये येऊन शाळेच्या सजावटीमध्ये इतर विद्यार्थ्यांना सहकार्य केले. शाळेचे मुख्याध्यापक अरुण यामावार सर यांनी केक कापून या दिवसाचा आनंद द्विगुणित केला व विद्यार्थ्यांना मिठाई, चॉकलेट चे वाटप करण्यात आले.
शाळा स्थापन दिवसाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांनी अहिंसेचे प्रणेते, आद्य वैज्ञानिक महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा शाळेला भेट दिली. भाग्यश्री येरमे, समीक्षा मेश्राम, उर्मिला बोंडे, साक्षी कोसरे या माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी असलेल्या आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या.
      सतिश शिंगाडे सर यांनी 'शाळा आहे भारतीय समाजाचा सुजान विज्ञानवादी नागरिक घडविण्याचे पवित्र मंदिर आहे', असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तर विनोद पोगुलवार सर यांनी शाळा स्थापन होऊन आत्तापर्यंतचा शाळेचा प्रगती विकास आपल्या मनोगतातून सांगितले. अरूण यामावार सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून 'आदर्श विद्यार्थी घडावेत आणि ते आपल्या समाजाच्या आणि कुटुंबाच्या कामी यावेत.' अशी विद्यार्थ्याकडून अपेक्षा केली.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी लाकडे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेषत: लाकडे मॅडम, शाळेतील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत