राष्ट्रीय हिवताप किटकजन्य नियंत्रण कार्यक्रम #sindewahi

Bhairav Diwase
प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा तर्फे मच्छरदाणी वाटप
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- ग्रामपंचायत सिरकाळा येथे राष्ट्रीय किटकजन्य नियंत्रण तथा प्रा. आ. केंद्र वासेरा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय येथे गावचे प्रथम नागरिक पपिता विजय भोयर(सरपंच) ,मा. वाल्मिक पेंदाम (उपसरपंच),ग्रा. प. सदस्य ,तसेच मा. डॉ. मयूर ननावरे (mo) प्रमुख उपस्थितीत मच्छरदाणी वाटप करण्यात आले. राष्ट्रीय किटकजन्य, कोविड लसीकरण, स्वच्छता, जलजन्य आजारावर व इतर आजारावर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात सहकारी कर्मचारी मा. डांगे (आ. से. ) ,आशा स्वयंसेविका, मा. विरेन्द्र का. मेश्राम(कोविड योद्धा),दंडेल जी , व इतर सहभागी होऊन गावकऱ्यांनी मच्छरदाणी कार्यक्रम सुरळीत पार पडला.