Top News

एन्यूटी हायब्रीड अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांचे कामे जलदगतीने पूर्ण करा #chandrapur

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांचे अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांना निवेदन
कोरपना:- कोरपना तालुक्यात एन्यूटी हायब्रिड अंतर्गत सन २०१८-१९ पासून भोयगाव ते गडचांदूर व नारंडा फाटा-अंतरंगाव बु-कवठाळा-पवनी रस्त्याचे अतिशय संथगतीने काम सुरू आहे सदर काम २ वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे होते परंतु अद्यापही सदर कामे पूर्ण झळलेली नाही त्यामुळे सदर रस्त्याचे कामे जलदगतीने पूर्ण व्हावे याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांची भेटून घेऊन निवेदन दिले.

एन्यूटी हायब्रीड अंतर्गत सुरु असलेल्या असलेले रस्ते हे कोरपना व गडचांदूरला थेट चंद्रपूरला जोडणारे आहेत परंतु कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे तसेच वाहतुकदारांनासुद्धा रस्त्यावरच्या धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे,तसेच धुळीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे तसेच रस्त्याचे काम ठिकठिकाणी अर्थवट असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तसेच कंत्राटदारांनी ठिकठिकाणी छोट्या पुलांचे काम अर्धवट सोडून दिलेले आहे त्यामुळे सुद्धा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे सासर्व बाबींची दखल घेत भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी  अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांना भेटून यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आपण याबाबत तात्काळ उचित कार्यवाही करू असे आश्वासन यावेळी अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांनी दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने