Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंढरी (कोकेवाडा) येथे प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा संपन्न #sindewahi

रमाकांत लोधे जि. प. सदस्य चंद्रपुर यांचा सामाजिक उपक्रम
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- स्वर्गीय श्रीधरराव.पा. लोधे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मा:रमाकांत लोधे जि. प. सदस्य चंद्रपुर यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंढरी (कोकेवाडा) येथे भव्य प्रवेशद्वार आपल्या स्वखर्चातून बांधून दिले. आज दिनांक 28/12/2021 रोजी लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक वितरण मा: रमाकांत लोधे जि. प. सदस्य चंद्रपुर यांनी केले.आपल्या उदघाटनीय भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असे आश्वासन रमाकांत लोधे यांनी केले . विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत वाचनालय, शुद्ध पाणी पिण्यासाठी आरो , शाळेमध्ये खुली जीम यासारखी महत्त्वपूर्ण कामं शासकीय निधीतून करून दिली आहेत. त्यांच्या कार्याबद्दल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व समस्त गावकरी मंडळी त्यांचे आभार मानले. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री: अरविंद किरीमकार पेंढ़री , श्री:यादवराव मेश्राम सरपंच पेंढ़री ,श्री:चंद्रकांत शिंदे माजी प. स. सदस्य सिंदेवाही ,श्री:घनश्याम चौखे माजी उपसरपंच,श्री:सुभाष राऊत माजी ग्रामपंचायत सदस्य ,श्री:संजय गहानें रत्नापूर ,श्री:कपिल मेश्राम सामाजिक कार्यकर्ता) रत्नापुर, श्री: दिवाकर चाचरकर माजी तंटामुक्ती सदस्य पेंढरी,तथा गावकरी पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.                          कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन श्री: मनोज मानकर   सर प्रास्ताविकश्री: विनोद लांडगे  सर आभार प्रदर्शनश्री: बंडू राऊत यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत