Click Here...👇👇👇

माँ माणिकादेवीच्या जयघोषात गेवरा बुज येथे नागदिवाळी #saoli

Bhairav Diwase
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- तालुक्यातील गेवरा बुज येथे आदिवासी माना जमात मंडळ व विद्यार्थी संघटना गेवरा बुज रामनगर च्या वतीने मुक्ताई व नागदिवाळी महोत्सव २९ व ३० डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. २९ डिसेंबरला परिसर स्वच्छता करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यानिमित्त रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात अनेक युवतींनी भाग घेतला. यानंतर मुठपूजा, खनाची पूजा करून महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला.
🎉
नागदिवाळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पि.एम.चौधरी से.नि.वनपरिक्षेत्र अधिकारी साहेब होते. तर मार्गदर्शक म्हणून प्रा.धारणे सर से.नि.प्राचार्य विहिरगाव, पी.के.घोडमारे सर से.नि.मुख्याध्यापक गडचिरोली प्रमुख पाहुणे म्हणून नंदुभाऊ जांभुळे जिल्हाध्यक्ष वि.यु.सं., निखिल दडमल वि.यु.सं. मुल/सावली, सचिन मानगुळधे वि.यु.सं. जिल्हा संपर्क प्रमुख उपस्थित होते.
🎉
मान्यवरांनी माना समाज बांधवांना समाजप्रबोधन करून समाजाची प्रगती कशी होईल, समाजाचा शैक्षणिक, आर्थिक स्तर कसा उंचावता येईल आणि महिलांचे सक्षमीकरण कसे करता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शालेय मुलाचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी पं.स.सदस्या संगीताताई चौधरी, बोरमाळा येथील सरपंच भोजराज धारणे, हनवते लाईनमॅन गेवरा, सोनू पा. चौधरी, एन. टी. नन्नावरे, अभिनंदन घरत,अमर चौधरी, संदीप शेरकुरे, हेमराज गायकवाड, अक्षय घोडमारे, विनायक वाकडे, राजुभाऊ नन्नावरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी माना जमात मंडळाने सहकार्य केले.
🎉