💻

💻

"त्या" पट्टेदार वाघाने साधली "हॉट्रीक" #tiger #tigerattack


पोंभुर्णा:- पोंभुर्णा वनपरिक्षेतात वाघाची दहशत कायम असून चेक आष्टा फाट्यावर जवळ गुरुवारला दुपारच्या सुमारास पट्टेदार वाघाने एका बकरीला ठार केल्याची घटना घडली.
पोंभुर्णा वनपरिक्षेतात असलेल्या चेक आष्टा फाट्याजवळ गुरुवारला दुपारच्या सुमारास पट्टेदार वाघाने एका बकरीला ठार केल्याची घटना घडली. लगातार ३ दिवस पट्टेदार वाघाने तिन बकरीला ठार केल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पहिल्या दिवशी चेक आष्टा गावालगत असलेल्या नाल्याजवळ मंगळवारला सुरेश ताजणे यांच्या मालकीच्या बकरीला वाघाने ठार केल्याची घटना घडली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल बुधवारला वाघाने एका बकरीला ठार केल्याची घटना घडली असून हि बकरी अमोल कोसरे यांच्या मालकीची आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज गुरुवारी चेक आष्टा फाट्याजवळ गुरुवारला दुपारच्या सुमारास पट्टेदार वाघाने एका बकरीला ठार केल्याची घटना घडली. या तिन्हीही घटना लगातार घडल्याने त्या पट्टेदार वाघाने हॉट्रीक साधल्याची चर्चा गावभर रंगली आहे.
तो वाघाला जंगलात पळवून लावण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत असताना तो पट्टेदार वाघ पुलाच्या खाली घुसल्या. पुलीया एका बाजूला बंद असल्याने तो वाघ तिथेच अडकला. तो पट्टेदार वाघ पुलाच्या खाली अडकल्याने नागरिक संताप व्यक्त करत त्या वाघाला पिंजरा लावून पकडण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. वनविभागाची टिम व‌ पोलिस घटनास्थळी उपस्थित आहे. पुढील तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत