Top News

सावधान! जिल्ह्यात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या पोहोचली 869 वर #corona

चंद्रपूर:- 24 तासात जिल्ह्यात 41 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 227 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 100, चंद्रपूर 32,बल्लारपूर 29, भद्रावती 9, नागभीड 3, मुल 16, सावली 3, पोंभूर्णा 1, राजुरा 5, चिमूर 5, वरोरा 11, कोरपना 12 तर जिवती येथे 1 रुग्ण आढळून आले असून ब्रह्मपुरी, सिंदेवाही, गोंडपिपरी व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 89 हजार 856 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 442 झाली आहे. सध्या 869 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 15 हजार 167 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 23 हजार 686 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1545 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने