जाहिरात... Advertisement... विज्ञापन

डुकरांच्या धडकेत दुचाकीचालक गंभीर जखमी #accident

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील नायवाडा जवळ दि. 17 जानेवारी रोज सोमवारला रात्री 10:30 च्या सुमारास राजेंद्र राठोड यांनी माथाडी वरुन जात असताना नायवाडा जवळ अचानक समोरुन डुकराने धडक बसल्याने गाडी क्र MH-34 BT 0870 या गाडीची पुर्णपणे तोडफोड झाली. 
चालक राजेंद्र राठोड यांना गंभीर मार लागला असुन त्यांनी जखमी अवस्थेत आरडाओरड केली असता गावातील लोकांनी घटणास्थळ गाठुन डुकराना हिसकाऊन लावले. जखमींना व्यक्तीला खाजगी गाडीने ग्रामीण रुग्णालय पाटण ला हलवण्यात आला. व या घटनेची माहिती वनविभागाला कळताच वनविभागाचे कर्मचारी मा. राखुंडे सर व संदिप सर यांनी घटनास्थळ गाठुन पंचणामा केला आहे व पुढील तपास सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत