Top News

२४ वर्षीय तरुणाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार #Rape

गोंडपिपरीत तालुक्यातील घटना
गोंडपिपरी:- गोंडपीपरी तालुक्यातील वटराना येथील अल्पवयीन मुलीवर खराळपेठ येथील २४ वर्षीयश तरुणांने बलात्कार केल्याची घटना दि. १६ जानेवारी रोज रविवारला घडली.

बाजाराचा दिवस असल्याने अल्पवयीन मूलगी बाजारातून भाजीपाला खरेदी करून घरी परत येत असताना २४ वर्षीय आरोपी अतुल गोविंदा तावाडे रा. खराळपेठ हे सोमनपली कडे जात असल्याचे सांगत तिला दुचाकीवर बसविले. दुचाकींत पेट्रोल टाकण्याचा बहाणा करून खराळपेठ येथील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
आपली फसवणुक झाल्याचे लक्ष्यात येताच तिने आरडाओरडा केली. पण नराधमाने गळा दाबून तिचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. अश्यातच ती भाजीपाल्याची पिशवी तिथेच टाकून जंगलातून धावत मुख्य मार्गावर येत मदतीची विनवणी करू लागली. अश्यातच त्याच मार्गवर पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकी थांबवली असता तिने घडलेला प्रकार सांगितला.
पीडीतिने सदर प्रकाराबाबत गोंडपीपरी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोस्को अंतर्गत आरोपीवर 363, 376, 376 ab भादवी सह कलम 4, 6, 8, 12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू याच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने