जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संदर्भात शिवागळी करून अपशब्द वापरल्या बद्दल कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा #rajura

माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या नेतृत्वात भाजपा राजुरा शिष्टमंडळाद्वारे केली मागणी
राजुरा:- कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी दिनांक 16 जानेवारी 2022 ला सायंकाळी वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणूक प्रचारा दरम्यान व्हिडीओ क्लिपवर बातमी प्रकाशित झाली होती,सदर बातमी मध्ये भंडारा जिल्हा परिषद निवडणुकी दरम्यान प्रचार करतांना आम जनतेत सार्वजनिक ठिकाणी श्री.नाना पटोले यांनी मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब,यांना मी मारू शकतो,मी त्यांना शिवा घालतो,अशा अशब्दाची जाहीर वाच्यता केली,तमाम भारतीय जनता पार्टी तथा सर्व सामान्य जनतेला पंतप्रधाना बद्दल अपशब्द बोलून अवमानीत केल्या मूळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या,ही बाब अतिशय गंभीर असुन,यासंदर्भात राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी राजुराच्या वतीने पोलीस निरीक्षक राजुरा यांना निवेदन देण्यात आले व श्री.नाना पटोले यांच्या वर गुन्हा दाखल करून अटक करण्याची यावेळी मागणी करण्यात आली.
ही घटना भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचे प्रचार दरम्यान आहे,सदर बाब गंभीर आहे,पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी एका संवैधानिक पदावर आहेत त्यांचे संदर्भात होणाऱ्या सन्मान करण सुरक्षा विषयक बाबीचा भाग म्हणून श्री.नाना पटोले यांना अटक करून कायद्यानुसार कार्यवाही करावी अशीही मागणी शिष्टमंडळाद्वारे केली आहे.यावेळी माजी आमदार अँड या सर्व घटनेचा निषेध नोंदवला व म्हणाले की मा.पंतप्रधान हे कोणत्या एका पक्षाचे नसून संपूर्ण भारताचे आहे,त्यांच्या बद्दल आदर ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे,अश्या प्रकारचे व्यक्तव करून मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अपमान करत आहे,यापुढे अश्या प्रकारे पुढे अपमान झाल्यास भारतीय जनता पार्टी खपवून घेतल्या जाणार नाही,श्री.नाना पटोले यांच्या त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावे व अटक करावी अशीही यावेळी मागणी माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी केली आहे.
यावेळी भाजपचे वतीने निषेध नोंदवला व शिष्टमंडळाद्वारे निवेदन दिले,याप्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजपा तालुका महामंत्री प्रशांत घरोटे,भाजपचे नेते महादेव तपासे,भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय उपगणलावार, माजी नगरसेवक राधेश्याम अडानिया,माजी नगरसेवक राजेंद्र डोहे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे,ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी,भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,ग्रामपंचायत सदस्य रवि गायकवाड,युवा नेते गणेश रेकलवार,सय्यद कुरेशी,पराग दातारकर,सचिन बैस,प्रकाश आस्वले,जनार्धन निकोडे,नितीन बामरटकर,संजय समर्थ,अरुण लोहबळे,संदीप मडावी आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत