जाहिरात... Advertisement... विज्ञापन

भाजपा युवा मोर्चा तर्फे युवा दिनाच्या निमित्ताने मोफत लसीकरण शिबिरचा दुसरा दिवस. #Ballarpur


बल्लारपूर:- १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती तथा युवा दिनाचे औचित्य साधून भाजपा युवा मोर्चा बल्लारपूर तर्फे १५ ते १८ वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण शिबिरची सुरुवात करण्यात आली.कारण कोरोना च्या वाढत्या महामारी ला लक्षात घेता केंद्राच्या मोदी सरकारने संपूर्ण भारतात आधी १८ वयोगटा पेक्षा वरील नागरिकांना मोफत लसीकरण दिले त्यानंतर आता १५ ते १८ वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण देण्याचं ध्येय हाती घेतले.
त्यामुळे महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहिर व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात युवा दिनाचे औचित्य साधून माउंट सायन्स ज्यू. कॉलेज व कला वाणिज्य ज्यू. कॉलेज बल्लारपूर येथे ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर चे डॉक्टर श्री.गजानन मेश्राम व टीमच्या सहकार्याने मोफत लसीकरण शिबिर घेण्यात आले या प्रसंगी भाजयुमो जिल्हा संघटन महामंत्री मिथिलेश पाण्डे, जिल्हा उपाध्यक्ष मोहित डंगोरे, जिल्हा सचिव शिवाजी चांदेकर, विद्यार्थी आघाडीचे प्रतीक बारसागडे, आदित्य शिंगाडे, पियुष मेश्राम, केतन भेंडे यांनी परिश्रम घेत लसीकरण शिबिर संपन्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत